India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, March 30, 2026
Loading latest news...
News30 March 20267 views

PNG कनेक्शन घ्या, नाहीतर LPGवर परिणाम; सरकारची नागरिकांना सूचना

P
Puja Nitnaware
Published in General
PNG कनेक्शन घ्या, नाहीतर LPGवर परिणाम; सरकारची नागरिकांना सूचना

PNG कनेक्शन घ्या, नाहीतर LPG पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो – सरकारची सूचना.

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका भारतातील ऊर्जा पुरवठ्यावर बसू लागला आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, नागरिकांना वेळेवर गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) वापरण्याचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत कनेक्शनसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. हा नियम घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी लागू राहणार आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या परिसरात पीएनजी उपलब्ध असूनही नागरिकांनी त्यासाठी अर्ज केला नाही, तर त्यांच्या एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, ज्यांनी आधीच पीएनजीसाठी अर्ज केला आहे आणि कनेक्शन मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत, त्यांना एलपीजीचा पुरवठा सुरूच राहील.

दरम्यान, अर्ज प्रक्रियेबाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी सुविधा सुरू आहे किंवा सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहे, त्याठिकाणीच हा नियम लागू राहणार आहे.

Tags:#PNGConnection#EnergyCrisis#LPGSupply#NaturalGas#GovernmentAlert

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
57
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
123
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
15
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com