India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, February 6, 2026
Loading latest news...
News6 February 20265 views

गडचिरोली ‘ग्रीन स्टील हब’कडे; विदर्भाच्या औद्योगिक भवितव्याचा नवा अध्याय; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

R
Rutuja
Published in General
गडचिरोली ‘ग्रीन स्टील हब’कडे; विदर्भाच्या औद्योगिक भवितव्याचा नवा अध्याय; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीला ग्रीन स्टील हब बनवण्याची घोषणा केली. विदर्भात मोठी औद्योगिक गुंतवणूक व रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा.

नागपूर : नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याची ओळख बदलून त्याला देशाच्या ‘ग्रीन स्टील हब’च्या नकाशावर आणण्याचा राज्य सरकारचा ठाम संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत संपूर्ण स्टील इकोसिस्टीम उभारून पर्यावरणपूरक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक दरात पोलाद उत्पादन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) यांच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवात विदर्भाच्या औद्योगिक विकासाचा दूरगामी आराखडा मांडण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात ‘मॅग्नेट हब’ संकल्पनेतून उद्योगविकास साधून त्याचा लाभ शेजारील जिल्ह्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. नागपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राच्या एकात्मिक ऑटोमोबाईल प्रकल्पातून २०२८ पासून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, शहरात देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल इकोसिस्टीमही आकार घेत आहे. यामुळे जवळपास एक लाख रोजगारनिर्मितीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अमरावती येथे पीएम मित्रा योजनेअंतर्गत दुसरा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क उभारला जाणार असून, विमानतळाजवळ एव्हिएशन स्कूल सुरू करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. याचा लाभ यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) च्या संधी लक्षात घेता राज्याचे औद्योगिक धोरण अधिक महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नळगंगा प्रकल्प, जलनियोजन, अन्नप्रक्रिया आणि गॅसआधारित उद्योगांवरही त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

राज्याचे उद्योग सचिव पी. अन्बलगन यांनी आगामी औद्योगिक क्लस्टरची माहिती देत २०४७ पर्यंत विदर्भ देशाच्या विकासात निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. AID चे अध्यक्ष आशिष काळे यांनी प्रास्ताविकात मागील औद्योगिक महोत्सवांतील प्रगतीचा आढावा घेतला. जीसीसी आणि बांबू उद्योगासंबंधी प्रस्ताव औद्योगिक धोरणात समाविष्ट झाल्याची माहिती त्यांनी दिली. शंभर एकरांवर उभारण्यात येणारी ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी आणि विविध कौशल्यविकास उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात उद्योगवाढीसोबत कुशल मनुष्यबळ निर्मितीची गरज अधोरेखित केली. गडचिरोलीतील दर्जेदार लोहखनिजामुळे हा जिल्हा जागतिक पातळीवरील स्टील हब ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चार महत्त्वाचे सामंजस्य करार झाले. सुपरस्मेलटर्स लिमिटेडकडून १० हजार कोटींची गुंतवणूक, तर महिंद्रा अँड महिंद्राकडून

पुढील दहा वर्षांत १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. यासोबतच अन्य उद्योगसंस्थांबरोबरही करार झाले.

उद्घाटन सोहळ्यात पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विदर्भात गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला राज्य व केंद्र सरकारचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योगजगतातील मान्यवर आणि AID चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:#Gadchiroli Green Steel Hub#Devendra Fadnavis Announcement#Vidarbha Industrial Development#Maharashtra Steel Industry#Advantage Vidarbha 2026

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
28
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
56
Read More →

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Jan 18, 2026
23
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
गडचिरोली ‘ग्रीन स्टील हब’कडे; विदर्भाच्या औद्योगिक भवितव्याचा नवा अध्याय; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - India Morning