India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, March 16, 2026
Loading latest news...
News7 February 202619 views

२०५० मध्ये सोनं १५ लाखांच्या पुढे? तज्ज्ञांच्या अंदाजांनी गुंतवणूकदारांमध्ये खळबळ!

P
Puja Nitnaware
Published in General
२०५० मध्ये सोनं १५ लाखांच्या पुढे? तज्ज्ञांच्या अंदाजांनी गुंतवणूकदारांमध्ये खळबळ!

सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असून, भविष्यात या दरांचा आलेख कुठे जाऊन थांबेल, याबाबत नवे अंदाज समोर येत आहेत.

नागपूर : जागतिक पातळीवर वाढत चाललेली अस्थिरता, महागाईचा दबाव आणि भू-राजकीय संघर्ष यांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होताना दिसत आहे. विशेषतः सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असून, भविष्यात या दरांचा आलेख कुठे जाऊन थांबेल, याबाबत नवे अंदाज समोर येत आहेत.

सध्या अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंध हे जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्रबिंदू ठरत आहेत. अमेरिका काही आंतरराष्ट्रीय संस्थांपासून अलिप्त होत असल्याचं चित्र असताना, चीन मात्र जागतिक व्यासपीठांवर आपली भूमिका अधिक मजबूत करत आहे. या बदलत्या समीकरणांचा परिणाम केवळ राजकीय पातळीवरच नाही, तर थेट आर्थिक बाजारपेठांवरही होत आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.

इतिहासाकडे पाहिल्यास, युद्ध, आर्थिक मंदी, चलनसंकट किंवा वाढती महागाई अशा परिस्थितींमध्ये सोनं ‘सेफ हेवन’ म्हणून ओळखलं जातं. सध्याच्या परिस्थितीतही चीन, भारत आणि रशिया यांसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. डॉलरवरील विश्वास कमी होत चालल्याने आणि त्याच्या मूल्यातील चढ-उतारांमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर २०५० पर्यंत सोन्याच्या दरांबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही अहवालांनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर २०५० साली प्रति तोळा १४ ते १५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर काही विश्लेषकांचा अंदाज याहूनही पुढे जात असून, त्यांच्या मते सोन्याचे दर तब्बल ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, सध्या सोन्याचे दर आधीच उच्चांकावर असल्याने गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोनं भविष्यात कितपत विश्वासार्ह ठरेल, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे.

Tags:#Experts predictions#Gold Rate#Nagpur news#Maharashtra news#Gold rate to surpass in 2050

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
114
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
65
Read More →

High alert after Trump’s warning, Americans told to leave 14 Nations

Fighting between the United States and Iran has become very serious.

Mar 3, 2026
11
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com