India Mornings
India Morning
Global News Portal
Sunday, February 8, 2026
Loading latest news...
News7 February 20264 views

येत्या १० तारखेला चर्चा होणार? राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी अपडेट

P
Puja Nitnaware
Published in General
येत्या १० तारखेला चर्चा होणार? राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी अपडेट

सुनील तटकरे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान या विषयावर चर्चा होण्याचे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही सर्वांनी मिळून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. विलीनीकरणासारखा विषय सखोल चर्चेनंतरच ठरवला जाईल.” १० फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित असतील, त्यावेळी त्यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत चर्चा केली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तटकरे पुढे म्हणाले की, सुनेत्रा पवार दिल्ली दौर्‍यावर जाण्याचीही शक्यता असून, त्या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकते. “योग्य वेळ आल्यावर सर्व संबंधित नेते एकत्र बसून विलीनीकरणावर चर्चा करतील,” असे संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये या मुद्द्यावर मतभेद असल्याचेही स्पष्ट होत आहे. अजित पवार गटातील काही नेत्यांनी विलीनीकरणास अनुकूल नसल्याची भूमिका अप्रत्यक्षपणे मांडली आहे. तर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांची विलीनीकरणाबाबत सकारात्मक भूमिका होती, असा दावा करत आहेत. त्यामुळे येत्या काळात या विषयावर काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags:##Sunil Tatkare#10 feb##NCP Merger#Mumbai news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
58
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
53
Read More →

Tehran world TV premiere: John Abraham in a powerful thriller

John Abraham’s action thriller Tehran will have its world TV premiere on Zee Cinema on Saturday, 31 January at 1 PM.

Jan 28, 2026
9
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com