India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, March 14, 2026
Loading latest news...
News13 February 202612 views

टी-२० विश्वचषकात धक्कादायक निकाल; झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी मात

R
Rutuja
Published in General
टी-२० विश्वचषकात धक्कादायक निकाल; झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी मात

T20 विश्वचषक 2026 मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी विजय मिळवत मोठा अपसेट घडवला.

२०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली. या विजयासह झिम्बाब्वेचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला गेला, तर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने निर्धारित षटकांत २ बाद १६९ धावांचा भक्कम डाव उभारला. प्रत्युत्तरात १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९.३ षटकांत १४६ धावांवर आटोपला.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. दुसऱ्याच षटकात जोश इंगलिस बाद झाला आणि त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन व टिम डेव्हिड यांनाही फारशी कामगिरी करता आली नाही. एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद २९ अशी झाली होती. ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू रेनशॉ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ती झुंज अपुरी ठरली. रेनशॉने ६५ धावांची खेळी केली, तर मॅक्सवेलने ३१ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझारबानी याने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत टाकले, तर ब्रॅड इव्हान्सने ३ गडी बाद केले.

त्याआधी झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळीचे मिश्रण दाखवले. तादिवानाशे मारुमानी आणि ब्रायन बेनेट यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. मारुमानीने २१ चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर रायन बर्ल आणि बेनेट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भर घातली. बर्लने ३५ धावांचे योगदान दिले. बेनेटने ५६ चेंडूत ६४ धावा करत नाबाद राहिला. कर्णधार सिकंदर रझा यानेही १३ चेंडूत २५ धावांची जलद खेळी करत संघाचा डाव मजबूत केला.

झिम्बाब्वेच्या शिस्तबद्ध फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे स्पर्धेतील पुढील सामने अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Tags:#T20 World Cup 2026#Zimbabwe vs Australia#Sikandar Raza#Blessing Muzarabani#Matthew Renshaw

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

दूसरी बार दूल्हा बनेंगे शिखर धवन, फरवरी में सोफी शाइन से रचाएंगे विवाह

पूर्व भारतीय क्रिकेटर शिखर धवन फरवरी 2026 में गर्लफ्रेंड सोफी शाइन से दिल्ली-एनसीआर में दूसरी शादी करने जा रहे हैं।

Jan 6, 2026
92
Read More →

अर्जुन तेंदुलकर की शादी में शामिल होंगे डिप्टी सीएम एकनाथ शिंदे, सचिन तेंदुलकर ने दिया न्योता

भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज बल्लेबाज़ सचिन तेंदुलकर ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे को अपने बेटे अर्जुन तेंदुलकर के विवाह समारोह में शामिल होने के लिए आमंत्रित किया है।

Feb 19, 2026
32
Read More →

नागपूर भारत–न्यूझीलंड टी-२० लढतीसाठी सज्ज; टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला!

भारत–न्यूझीलंड टी-20 मालिकेतील पहिला सामना आज नागपूरच्या VCA स्टेडियमवर; एकदिवसीय पराभवानंतर भारत दमदार पुनरागमनाच्या तयारीत.

Jan 21, 2026
29
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com