India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 12, 2026
Loading latest news...
News16 February 202611 views

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात ९ आरोपी अटकेत

R
Rutuja
Published in General
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात ९ आरोपी अटकेत

रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात ९ आरोपी अटकेत; हरियाणातून मुख्य शूटर पकडला, मकोका अंतर्गत गुन्हा दाखल.

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर १ फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हरियाणा येथून मुख्य शूटरसह तीन जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ आरोपींना अटक झाली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या विशेष कार्यदलाच्या मदतीने केली.

हरियाणातून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ऋतिक यादव (आग्रा), दीपक (नोएडा), सनी आणि सोनू (दोघेही आग्रा) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यापैकी एक जण मुख्य शूटर असून इतर त्याचे सहकारी आहेत.

याआधी पोलिसांनी पुणे आणि परिसरातून पाच आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी, स्वप्नील सकट आणि आसाराम फसाळे उर्फ बाबू (शस्त्र पुरवठादार) यांचा समावेश आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण कटाचा सूत्रधार शुभम लोणकर असल्याचे तपासात समोर आले आहे. तो सध्या फरार असून त्याचा संबंध कुख्यात गुंड Lawrence Bishnoi यांच्या टोळीशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

स्कूटरमुळे उकल झाली-

या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा धागा एका स्कूटरमुळे सापडला. शेट्टी टॉवरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर विले पार्ले पश्चिमेकडील एका हॉटेलजवळ एक स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करून बोटांचे ठसे, डीएनए नमुने आणि इतर पुरावे गोळा केले.

तपासात समोर आले की ही सेकंड-हँड होंडा डिओ स्कूटर पुण्यातील कर्वेनगर येथील अमन मारोटे यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. १९ वर्षीय आदित्य गायकी याने जानेवारी महिन्यात सुमारे ३० हजार रुपयांना ही स्कूटर घेतली होती. ही खरेदी शुभम लोणकरच्या सांगण्यावरून स्वप्नील सकटने पैसे पुरवून केल्याचे उघड झाले आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपींच्या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Tags:#Rohit Shetty Firing Case#Mumbai Police Action#Lawrence Bishnoi gang#Shubham Lonkar#MCOCA Case

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

Tehran world TV premiere: John Abraham in a powerful thriller

John Abraham’s action thriller Tehran will have its world TV premiere on Zee Cinema on Saturday, 31 January at 1 PM.

Jan 28, 2026
21
Read More →

“When Family Doubts You, It Hurts the Most,” Govinda speaks out

Actor Govinda reacts to wife Sunita Ahuja’s allegations, speaks about family pain, politics exit, and efforts to support his son’s acting career.

Feb 10, 2026
10
Read More →

लग्न तर करणारच; श्रद्धा कपूरच्या एका उत्तराने चाहत्यांमध्ये उत्सुकता

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या साध्या स्वभावासाठीही चाहत्यांच्या पसंतीस उतरते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असून तिच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने वर चढताना दिसतो.

Jan 7, 2026
59
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com