मुंबई - सध्या हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या संशोधनानुसार, दिवसातील इतर वेळांच्या तुलनेत सकाळी 6 ते दुपारी 12 या कालावधीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तब्बल 40 टक्क्यांनी अधिक असते. यामागे शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रियांमुळे हृदयावर येणारा अतिरिक्त ताण कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पहाटेचा वेळ आरोग्यासाठी पोषक मानला जात असला, तरी याच काळात शरीर झोपेतून जागे होताना रक्तदाब, हार्मोन्स आणि रक्तप्रवाहात अचानक बदल होतात. याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यप्रणालीवर होतो आणि धोका वाढतो.
सकाळी हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?
1. कोर्टिसोल हार्मोनमध्ये वाढ
सकाळी कोर्टिसोल हार्मोन वाढल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयावर जास्त ताण येतो.
2. रक्त अधिक घट्ट होणे
पहाटे रक्त नैसर्गिकरित्या घट्ट होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो.
3. प्लेटलेट्सची जास्त सक्रियता
या वेळेत प्लेटलेट्स अधिक सक्रिय झाल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते.
ही लक्षणे दिसताच सतर्क व्हा-
- छातीत वेदना किंवा दडपण
- डाव्या हातात, खांद्यात किंवा जबड्यात वेदना
- अचानक श्वास घेण्यास त्रास
- थंड घाम, चक्कर
- तीव्र थकवा किंवा मळमळ
- हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
- सकाळी उठताच धावपळ किंवा जड व्यायाम टाळा
- दररोज 7–8 तास पुरेशी झोप घ्या
- सकाळी कोमट पाणी प्या
- बीपी, साखर, कोलेस्ट्रॉल असल्यास नियमित तपासणी व औषधोपचार करा

