India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 24, 2026
Loading latest news...
News24 March 202613 views

IPL मध्ये ऐतिहासिक व्यवहार; ‘राजस्थान रॉयल्स’ टीमची तब्बल १५ हजार कोटींना विक्री!

P
Puja Nitnaware
Published in General
IPL मध्ये ऐतिहासिक व्यवहार; ‘राजस्थान रॉयल्स’ टीमची तब्बल १५ हजार कोटींना विक्री!

नव्या मालकांची एंट्री!

मुंबई: आयपीएलच्या इतिहासात आजवरचा सर्वात मोठा सौदा पूर्ण झाला असून ‘राजस्थान रॉयल्स’ या फ्रँचायझीची विक्री तब्बल १.६३ अब्ज डॉलर्स (सुमारे १५,२८९ कोटी रुपये) इतक्या प्रचंड रकमेवर झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर मंगळवारी (२४ मार्च २०२६) अधिकृत स्वरूप मिळाले. या विक्रमी करारामुळे राजस्थान रॉयल्सचे नाव जगातील सर्वाधिक मौल्यवान क्रिकेट संघांमध्ये गणले जाऊ लागले आहे.

नवे मालक कोण? या मोठ्या व्यवहारामागे अमेरिकास्थित उद्योगपती काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदारांचा मजबूत गट आहे. या कॉन्सोर्टियममध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही नामांकित व्यक्तींचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

काल सोमानी हे भारतीय वंशाचे उद्योजक असून एडटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्पोर्ट्स टेक क्षेत्रात त्यांनी मोठी छाप पाडली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांचा राजस्थान रॉयल्समध्ये अल्पसा हिस्सा होता.

याशिवाय, वॉलमार्ट समूहाशी संबंधित रॉब वॉल्टन आणि फोर्ड मोटर कंपनीच्या मालक कुटुंबातील शीला फोर्ड हॅम्प यांचाही या गटात समावेश आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार, आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनीही या व्यवहारात अप्रत्यक्षरीत्या भूमिका बजावल्याची चर्चा आहे.

व्यवहाराची वैशिष्ट्ये या कराराअंतर्गत राजस्थान रॉयल्समधील १०० टक्के भागीदारी नव्या गटाकडे जाणार आहे. यापूर्वी मनोज बदाले यांच्याकडे प्रमुख हिस्सा होता, तर रेडबर्ड कॅपिटल आणि लॅचलन मर्डोक यांच्याकडे उर्वरित शेअर्स होते.

मात्र, हा बदल तात्काळ लागू होणार नसून आयपीएल २०२६ हंगाम संपल्यानंतर अधिकृत हस्तांतरण होईल. तोपर्यंत सध्याचे व्यवस्थापनच संघाचे कामकाज पाहणार आहे.

किमतीत झपाट्याने वाढ विशेष म्हणजे, २००८ साली राजस्थान रॉयल्सची किंमत केवळ ६७ दशलक्ष डॉलर्स इतकी होती. अवघ्या काही वर्षांतच या फ्रँचायझीची किंमत तब्बल २४ पट वाढल्याने आयपीएलच्या व्यावसायिक यशाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Tags:#IPL#IndianPremierLeague#RajasthanRoyals#RR##CricketNews

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

Link found? Action will follow: CM warns in Kharat case

Maharashtra CM Devendra Fadnavis said that just having a photo “Link Found? Action Will Follow: CM Warns in Kharat Case”

Mar 24, 2026
2
Read More →

अर्जुन तेंदुलकर की शादी में शामिल होंगे डिप्टी सीएम एकनाथ शिंदे, सचिन तेंदुलकर ने दिया न्योता

भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज बल्लेबाज़ सचिन तेंदुलकर ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे को अपने बेटे अर्जुन तेंदुलकर के विवाह समारोह में शामिल होने के लिए आमंत्रित किया है।

Feb 19, 2026
33
Read More →

बीएमसी चुनाव: आधिकारिक रुझानों में बीजेपी सबसे आगे

बीएमसी चुनाव के आधिकारिक रुझानों में बीजेपी सबसे आगे, शिवसेना, कांग्रेस और अन्य दलों में कड़ा मुकाबला।

Jan 16, 2026
35
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com