India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, January 20, 2026
Loading latest news...
News12 January 202623 views

सोन्या-चांदीच्या दरांचा नवा विक्रम; चांदी 2.65 लाखांच्या पुढे

R
Rutuja
Published in General
सोन्या-चांदीच्या दरांचा नवा विक्रम; चांदी 2.65 लाखांच्या पुढे

मुंबई सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी नवे विक्रम मोडले. चांदी जीएसटीसह 2.65 लाखांवर, सोन्यातही मोठी उसळी.

मुंबई- सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांनी नवे उच्चांक गाठले असून गुंतवणूकदारांसह ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात एका झटक्यात १४,४७५ रुपयांची मोठी वाढ झाली, तर सोन्याच्या किमतीत २,८८३ रुपयांची तेजी नोंदवली गेली. या दरवाढीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

आज जीएसटीशिवाय चांदीचा दर २,५७,२८३ रुपये प्रति किलोवर पोहोचला असून, जीएसटीसह चांदीची किंमत थेट २,६५,००१ रुपये प्रति किलोवर गेली आहे. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय १,४०,००५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला, तर जीएसटीसह सोन्याची किंमत १,४४,२०५ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे.

जुन्या उच्चांकांना मागे टाकले-

शुक्रवारी जीएसटीशिवाय चांदी २,४२,८०८ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आजच्या दरवाढीमुळे चांदीने ७ जानेवारीचा २,४८,००० रुपयांचा उच्चांकही मोठ्या फरकाने पार केला आहे. त्याचप्रमाणे, जीएसटीशिवाय सोने शुक्रवारी १,३७,१२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. आज सोन्याने २९ डिसेंबर २०२५ रोजीचा १,३८,१८१ रुपयांचा ‘ऑल टाइम हाय’ रेकॉर्ड मोडला आहे.

हे सर्व दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)कडून जाहीर करण्यात आले असून, IBJA दिवसातून दोन वेळा अधिकृत दर प्रसिद्ध करते.

कॅरेटप्रमाणे सोन्याचे आजचे दर-

२३ कॅरेट सोने: २,८७१ रुपयांच्या वाढीसह १,३९,४४४ रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह १,४३,६२७ रुपये)

२२ कॅरेट सोने: २,६४१ रुपयांनी महाग होऊन १,२८,२४५ रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह १,३२,०९२ रुपये)

१८ कॅरेट सोने: २,१६२ रुपयांची वाढ, दर १,०५,००४ रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह १,०८,१५४ रुपये)

१४ कॅरेट सोने: १,६८७ रुपयांची तेजी, दर ८१,९०३ रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह ८४,३६० रुपये)

दरम्यान सतत वाढणारी आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, डॉलरमधील हालचाल आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा यामुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये ही मोठी उसळी पाहायला मिळत असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.

Tags:##Gold Silver Record##सोन्याचे दर##चांदीचे दर##सराफा बाजार#Gold price

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
32
Read More →

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Jan 18, 2026
3
Read More →

Daily Zodiac Forecast: Check your luck today

Read your sign to know what to expect today only at India Morning.Daily Zodiac Forecast

Jan 9, 2026
43
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com