India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News3 February 20267 views

३० दिवस साखरमुक्त राहिल्यानंतर शरीरावर होणारे आश्चर्यकारक बदल!

P
Puja Nitnaware
Published in General
३० दिवस साखरमुक्त राहिल्यानंतर शरीरावर होणारे आश्चर्यकारक बदल!

साखर सोडण्याचा निर्णय तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो.

नागपूर: साखर सोडण्याचा निर्णय तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो, हे अनेकांना समजले असेल, पण ३० दिवसांचा प्रयोग केल्यावर त्याचे परिणाम अत्यंत आश्चर्यकारक असतात. वजन कमी होणे हा फक्त एक भाग आहे; मानसिक ताजगी, त्वचेवर चमक, पचन सुधारणा आणि हृदयाचे आरोग्य सुधारणाही दिसतात.

सुरुवातीचे दिवस – थोडे कठीण

साखर सोडल्यावर पहिले २-३ दिवस डोके दुखणे, चिडचिड होणे आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा जाणवते. शरीर ग्लुकोजशिवाय उर्जेचा दुसरा स्रोत शोधू लागते.

आठवड्यांनुसार बदल-

१ला आठवडा: उर्जेत चढ-उतार; शरीरातील सूज कमी होते, चेहरा कमी ‘पफी’ दिसतो.

२रा आठवडा: मानसिक स्पष्टता वाढते; दुपारी येणारी सुस्ती कमी होते.

३रा आठवडा: त्वचा अधिक स्वच्छ आणि तेजस्वी होते, फळांचा नैसर्गिक गोडवा जास्त जाणवतो.

४था आठवडा: वजन कमी होते, पचन सुधारते आणि साखरेची ओढ नष्ट होते.

साखर सोडल्याचे मुख्य फायदे-

हृदयाचे आरोग्य: ट्रायग्लिसराइड्स कमी होतात, रक्तदाब नियंत्रित राहतो.

तरुण दिसणे: त्वचेतील कोलेजन जास्त काळ टिकते; वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

स्थिर मूड: मूड स्विंग्स कमी होतात; दिवसभर अधिक आनंदी आणि शांत राहता येते.

साखर टाळण्यासाठी टिप्स-

सॉस, बिस्किटे आणि पॅकेटबंद पदार्थांमध्ये लपलेली साखर तपासा.

नैसर्गिक गोडवा: खजूर, मध, गूळ किंवा ताजी फळे वापरा.

पाणी भरपूर प्या; साखरेची ओढ लागल्यास ग्लास पाणी प्यावे.

आहाराचे साधे नियम-

सकाळी लिंबू-पाणी, नाश्त्यात मूग डाळीचे धिरडे/ओट्स, दुपारी भाजी-भाकरी-वरन, संध्याकाळी बदाम/फळे आणि रात्री हलके जेवण – असे ठेवा.

सुरुवातीचे ७ दिवस थोडे कठीण जातील, पण नंतर शरीर साखरमुक्त जीवनशैलीशी जुळवून घेईल.

साखर सोडल्यावर तुमचे मन, शरीर आणि त्वचा तीनही आरोग्यदायी बदल अनुभवतात, आणि दिवसेंदिवस जीवन अधिक ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटू लागते.

Tags:#Sugar free#Body changes#Health news#Nagpur news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

शरीरात झिंकच्या कमतरतेची लक्षणे; वेळीच ओळखा, आरोग्य सांभाळा

शरीरात झिंक कमी असल्यास रोगप्रतिकारक शक्ती घटते. झिंकच्या कमतरतेची लक्षणे आणि ती भरून काढण्याचे उपाय जाणून घ्या.

Feb 6, 2026
6
Read More →

सिर्फ मसाला नहीं, बदन दर्द और सर्दी में रामबाण उपाय है अदरक

अदरक को “औषधीय पौधा ऑफ द ईयर 2026” घोषित किया गया है। जोड़ दर्द, सर्दी-जुकाम, सूजन और पाचन में अदरक के चमत्कारी फायदे जानिए।

Jan 10, 2026
20
Read More →

शिंदे के इलाके में उद्धव गुट की जीत, ओवैसी बोले– AIMIM का असर

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) के अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ने महाराष्ट्र की राजनीति और ठाकरे भाइयों को लेकर बड़ा बयान दिया है।

Jan 17, 2026
25
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com