नागपूर : उप्पलवाडी MIDC परिसरातील एका पेपर मिलमध्ये भीषण स्फोटांची मालिका घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मिलमध्ये कार्यरत असलेले तब्बल १० ते १२ बॉयलर सिलेंडर एकामागोमाग एक फुटले, ज्यामुळे काही क्षणांत संपूर्ण औद्योगिक परिसर हादरून गेला.स्फोट इतके तीव्र होते की धमाक्यांचे आवाज दूरवरच्या वसाहतींमध्येही ऐकू आले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक कामगार व स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घटनास्थळापासून दूर धाव घेतली.
https://www.instagram.com/reel/DUkbsb5CEXo/
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्फोटांचे नेमके कारण, संभाव्य जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ही घटना असून, प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.



