हिंदू परंपरेत होळी हा केवळ रंगांचा सण नसून ज्योतिषशास्त्रानुसार परिवर्तनाचा टप्पा मानला जातो. 2026 मधील होळी विशेष ठरणार आहे, कारण या दिवशी आकाशात एकाच वेळी पाच शुभ राजयोग तयार होत आहेत. या ग्रहस्थितीचा काही राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
पाच राजयोगांचा प्रभाव आणि मिथुन-सिंह राशीला लाभ :
यंदाच्या होळीला शश योग, गजकेसरी योग, बुधादित्य योग, हर्ष योग आणि लक्ष्मी योग तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रहांची ही दुर्मिळ जुळवाजुळव काही राशींसाठी प्रगतीची दारे उघडणारी ठरणार आहे. विशेषतः तीन राशींना या काळात मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत.
मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये उल्लेखनीय वाढ अनुभवायला मिळू शकते. बुधादित्य योगाच्या प्रभावामुळे व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक किंवा जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी आणि लक्ष्मी योग लाभदायक ठरणार आहेत. समाजात मान-सन्मान वाढेल. राजकारण किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आरोग्य समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात सौहार्द वाढेल आणि रखडलेली विवाहसंबंधित कामे पूर्णत्वास जाऊ शकतात.
तूळ राशीसाठी आर्थिक प्रगतीचे संकेत :
तूळ राशीच्या जातकांसाठी शश आणि हर्ष योग शुभ फलदायी ठरणार आहेत. परदेशाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. आर्थिक अडचणी कमी होऊन कर्जातून सुटका होण्याचे संकेत आहेत.
या सर्व राजयोगांच्या संयोगामुळे 2026 ची होळी काही राशींसाठी भाग्योदयाचा टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रहस्थितीतील या बदलामुळे करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक घडामोडी घडू शकता



