नागपूर, मार्च २०२६: अॅक्सिस बँक या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्र बँकेने टेस्लासाठी पसंतीची फायनान्सर बनण्याची घोषणा केली आहे, ज्यासह बँक टेस्ला ग्राहकांना सर्वोत्तम फायनान्सिंग सोल्यूशन्स आणि वैविध्यपूर्ण ग्राहक अनुभव देत आहे. या सहयोगामधून भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेला चालना देण्याप्रती अॅक्सिस बँकेची कटिबद्धता दिसून येते, जेथे नाविन्यपूर्ण, ग्राहक-केंद्रित फायनान्सिंग सोल्यूशन्स दिले जातात, जे शाश्वत परिवहनाप्रती परिवर्तनाला साह्य करतात.
या सहयोगांतर्गत संपूर्ण भारतात फायनान्सिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यात येतील, ज्यामुळे प्रमुख मेट्रो शहरे व उदयोन्मुख ईव्ही हब्समधील ग्राहकांना टेस्लाच्या जागतिक मालकीहक्क अनुभवाशी संलग्न सोईस्कर, डिजिटली सक्षम फायनान्सिंग पर्याय मिळतील. या ऑफरिंगचा सुरूवातीच्या अडथळ्यांना दूर करत आणि ग्राहकांना सुलभ, सोईस्कर ऑनबोर्डिंग अनुभवाची खात्री देत टेस्ला खरेदी करण्याचा प्रवास सोपा करण्याचा मनसुबा आहे.
अॅक्सिस बँक सर्वोत्तम ऑटो-लोन ऑफरिंग्ज देईल, ज्या विशेषत: प्रीमियम ईव्ही ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या ऑफर्स पुढीलप्रमाणे:
प्रत्येक ग्राहकाच्या वैयक्तिक आर्थिक क्षमतेनुसार सानुकूल परतफेड करण्याच्या योजना. जवळपास १० वर्षांपर्यंत दीर्घ परतफेडीची मुदत. जलदपणे कर्ज मंजूरीसह पूर्णपणे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रिया.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत अॅक्सिस बँकेचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर मुनिष शारदा म्हणाले, ''भारतात इलेक्ट्रिक गतीशीलतेला चालना मिळत असताना अॅक्सिस बँकेला या परिवर्तनाला गती देण्यास साह्य करण्यासाठी टेस्लासोबत सहयोग करण्याचा अत्यंत अभिमान वाटतो. या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक वेईकल्स आणि नाविन्यपूर्ण, सर्वोत्तम फायनान्सिंग सोल्यूशन्स व विनासायास ग्राहक सहभागाला एकत्र आणत आहोत. यामुळे ग्राहकांना सोयीसुविधा किंवा स्थिरतेबाबत तडजोड न करता सहजपणे शाश्वत गतीशीलतेचा अवलंब करता येईल. या उपक्रमामधून जबाबदार बँकिंग व भविष्याकरिता सुसज्ज सोल्यूशन्सवरील आमचा सातत्यपूर्ण भर दिसून येतो.''



