तुमसर : तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका महिला कर्मचाऱ्याने तेथीलच एका मापाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवार रोजी मापारी व मजुरांनी बाजार समितीचे कामकाज पूर्णतः ठप्प केले. या घटनेमुळे बाजार समितीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. बाजार समितीच्या महिला रोखपालाने कामगारांना अपशब्द प्रयोग केल्याने संतप्त कामगारांनी संप पुकारले यादरम्यान तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी दखल घेऊन आंदोलनास्थळी भेट देऊन कामगारांची व्यथा जाणुन घेतली आणि बाजार समितीच्या संचालक मंडळाशी चर्चा करून याप्रकरणी मध्यस्थी करून तोडगा काढला त्यांनतर आंदोलन तात्पुरती स्थगित करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती रामद्याल पारधी, संचालक अरविंद कारेमोरे, प्रमोद कटरे, किरण अतकरी, कलाम शेख, हरेंद्र रहांगडाले, बावणे, बाबरे, शेखर सेलोकर यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आले होते.
News• 11 February 2026•12 views
कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथील कामकाज ठप्प
तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका महिला कर्मचाऱ्याने तेथीलच एका मापाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवार रोजी मापारी व मजुरांनी बाजार समितीचे कामकाज पूर्णतः ठप्प केले
Tags:#work halted#Agricultural Produce Market Committee#Tumsar News#Nagpur news#Maharashtra news



