हिंदू श्रद्धेनुसार शनिदेव हे न्यायाचे अधिपती मानले जातात. प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. त्यामुळे शनिदेवांविषयी लोकांच्या मनात आदरासोबत थोडी भीतीही कायम असते.
ज्योतिषशास्त्रात शनी हा अतिशय संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. सध्या शनी मीन राशीत भ्रमण करत असून १३ मार्च २०२६ पासून तो अस्त अवस्थेत होता. मात्र २२ एप्रिल २०२६ रोजी शनिदेव पुन्हा उदयास येणार आहेत. या बदलाचा काही राशींवर विशेष शुभ परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः साडेसाती संपण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या काही राशींना मोठा दिलासा मिळू शकतो.
मिथुन राशी-
या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. कामातील अडथळे दूर होऊन नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर यश आणि प्रतिष्ठाही मिळेल.
सिंह राशी-
सिंह राशीसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता असून कुटुंबातील वातावरणही आनंदी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन ऊर्जा वाढेल.
वृषभ राशी-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल.
वृश्चिक राशी-
या राशीच्या लोकांना उत्पन्न वाढीच्या संधी मिळतील. शिक्षण आणि ज्ञान क्षेत्रात प्रगती होईल. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील आणि आर्थिक अडचणी कमी होतील.
कुंभ राशी-
कुंभ राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा ताण कमी होताना जाणवेल. करिअरमध्ये स्थिरता येईल आणि मानसिक शांती वाढेल. दीर्घकाळापासून असलेले तणाव कमी होण्याची शक्यता आहे.
एकूणच, शनिदेवांच्या उदयानंतर या राशींना दिलासा, प्रगती आणि सकारात्मक बदलांचा अनुभव मिळू शकतो, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.



